पेंच मधून प्रवास करून नाशिक मध्ये आलेले गिधाड दारणा सांगवी येथे थांबले. ए.आर.इ.ए.एस.फाउंडेशन संस्था व वनविभाग मिळून केले रेस्क्यू :- ११ डिसेंबर रोजी पेंच व्याघ्र प्रकल्प नागपूर येथून पाठीवर ट्रान्समीटर लावलेले तसेच पायात J१३२ नावाने टॅगिंग करून सोडलेले लॉन्ग बिल्लड वल्चर (गिधाड)नाशिक जवळील अंजनेरी येथे १७ दिवसात ७०० किलोमीटर चा प्रवास करून आले होते. पण दोन दिवसांपासून हेच गिधाड निफाड तालुक्यातील दारणा सांगवी या गावात आल्याचे स्थानिक नागरिकांनी सांगितले.