राहुरी: तालुका हद्दीतून अपहरण झालेल्या अल्पवयीन मुलीची सुटका,अपहरण दरम्यान लैंगिक अत्याचार झाल्याने मुलगी गरोदर
श्रीरामपूर तालुक्यातील सोळा वर्षीय मुलगी राहुरी तालुक्यात मामाच्या गावी आलेली असताना तिचे अज्ञात इसमाने अपहरण केल्याबाबतचा गुन्हा पोलीस दाखल झाल्यानंतर तब्बल वर्षाने गोपनीय माहिती तथा तांत्रिक विश्लेषण करत सदर मुलीचा शोध लावण्यात पोलीसांना यश आले. नेवासा तालुक्यातील देवगड फाटा येथे अपहरण करणारा आरोपी रोहित अनिल अमोलिक याच्या ताब्यातून मुलीची सुटका करण्यात आली. आरोपीने अपहरणानंतर तिच्यावर लैंगिक अत्याचार केल्याने ती आठ महिन्याची त्यातून गर्भवती असल्याचे पोलीस तपासात समोर आले आहे.