रत्नागिरी: गणपतीपुळे भगवतीनगर येथे विहिरीत पडलेल्या बिबट्याची यशस्वी सुटका
दिनांक २१ सप्टेंबर रोजी गणपतीपुळे येथील भगवती नगरमधील एका विहिरीत पडलेल्या बिबट्याची वन विभागाने यशस्वी सुटका केली. सकाळी १०.०० वाजताच्या सुमारास स्थानिकांनी ही माहिती वन विभागाला दिली, त्यानंतर तातडीने बचावकार्य सुरू करण्यात आले. भूषण जयसिंग घाग यांच्या मालकीच्या ४० फूट खोल विहिरीत एक बिबट्या पडल्याची माहिती त्यांनी वनपाल पाली यांना दिली. ही विहीर घराच्या मागे १०० फूट अंतरावर असून, ती सुमारे १६ फूट गोलाकार आहे. विहिरीचा कठडा ३ फूट उंच असून, पाण्याची पातळी सुमारे ५ फुटांवर होती.