रोहा: रायगड जिल्ह्यातील रोहा येथे शिवसेना पक्षाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या रोड शो मध्ये उपमुख्यमंत्री शिंदे यांचा सहभाग
Roha, Raigad | Nov 30, 2025 रायगड जिल्ह्यातील रोहा येथे शिवसेना पक्षाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या आज रविवारी दुपारी १ च्या सुमारास रोड शो मध्ये शिवसेनेचे मुख्य नेते व उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे सहभागी झाले. यावेळी त्यांनी शिवसेनेच्या उमेदवारांचा प्रचार केला. रोहा नगरपालिका निवडणुकीत शिवसेनेच्या नगराध्यक्षपदाच्या उमेदवार शिल्पा धोत्रे आणि त्यांच्या सर्व सहकाऱ्यांना प्रचंड बहुमताने विजयी करा असे त्यांनी आवाहन केले. या रोड शोला रोहावासीयांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. शहरातील विविध भागांत उत्स्फूर्तपणे आमचे स्वागत करण्यात आले. या रोड शोमुळे संपूर्ण परिसर भगवामय झाल्याचे चित्र दिसत होते. मोठ्या प्रमाणावर झालेल्या घोषणाबाजीमुळे वातावरणात उत्साह संचारला होता. "रोह्यात बदल हवा… विकास हवा…” अशा घोषणांनी संपूर्ण शहर दुमदुमले होते.