सातारा: मतदान हा मूलभूत अधिकार; साताऱ्यात विद्यार्थ्यांच्या सहभागातून व्यापक जनजागृती मोहीम
Satara, Satara | Nov 27, 2025 मतदान हा भारतीय नागरिकांना संविधानाने प्रदान केलेला मूलभूत अधिकार आहे. या अधिकाराचे महत्त्व प्रत्येक मतदारापर्यंत पोहोचावे यासाठी सातारा जिल्हा प्रशासनाकडून मतदान जनजागृती मोहीम मोठ्या प्रमाणात राबवली जात आहे.या मोहिमेला सर्व स्तरातून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असून विद्यार्थीदेखील मोठ्या उत्साहाने या उपक्रमात सहभागी होत आहेत. साताऱ्यातील विविध शाळा व महाविद्यालयांमधील विद्यार्थी पथनाट्य, रांगोळी स्पर्धा, व्याख्यानमाला, जनजागृती रॅली अशा विविध उपक्रम राबविण्यात येत आहे.