लातूर -निलंगा नगरपरिषदेच्या निवडणुका पुढे ढकलल्यानंतर राजकीय वातावरणात चांगलाच ताप निर्माण झाला आहे. काही दिवसांपूर्वी स्थगित झालेल्या निवडणुकांवर चर्चा करताना आमदार अमित देशमुख यांनी एका सभेत केलेले भाषण सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये त्यांनी निलंगा नगरपरिषद निवडणुकीच्या संदर्भात लातूरचे खासदार सुधाकर काळगे हे नियमितपणे आढावा बैठका घेतील, असे वक्तव्य केले आहे.