रामटेक: नेहरू मैदान रामटेक येथे रामटेक भगिनी मंडळ रामटेक द्वारा आयोजित रास गरब्याची धूम
Ramtek, Nagpur | Sep 23, 2025 नवरात्रीच्या पावन पर्वावर नेहरू मैदान रामटेक येथे मंगळवार दिनांक 23 सप्टेंबरला सायं. सात वाजता पासून भव्य रास गरब्याची धूम बघावयास मिळत आहे. रामटेक भगिनी मंडळ व बिग बी ग्रुपच्या संयुक्त विद्यमाने दरवर्षीप्रमाणे यावर्षीही येथे मोठे आयोजन करण्यात आले आहे.सोमवार दिनांक 22 सप्टेंबरला सायंकाळी 7:00 वाजता पासून भव्य रास गरब्याला सुरुवात करण्यात आली. रात्री नऊ वाजता महाआरती करण्यात आली. या रास गरब्याला रामटेक शहरातील युवक, युवती, पुरुष, महिलांचा मोठा प्रतिसाद मिळत आहे.