वैजापूर: बीरोळा शिवरता आढळले बिबट्याचे पिल्लू, मादी बिबट्याचाही परिसरात वावर
वैजापूर तालुक्यातील डोंगरथडी भागातील बोरोळा शिवारात शनिवारी दुपारी शेतकऱ्यांना शेतात बिबट्याचे पिल्लू मिळून आले.याच परिसरात मादी बिबट्या ही दिसून आली असून याबाबत वनविभागाला माहिती देण्यात आली मात्र वनविभाला माहिती देऊनही वनविभागाचे अधिकारी ४ तास उलटूनही घटनास्थळी अद्याप एक नसल्याची माहिती हिंदवी जनक्रांती सेनेचे अजय पाटील साळुंके यांनी सायंकाळी साडेसात वाजेच्या सुमारास दिली आहे.तत्काळ या बिबट्याचा बंदोबस्त करावा अशी मागणी शेतकरी वर्गाकडून केली जात आहे.