खुलताबाद: वारंवार वीजखंडामुळे संताप! वेरुळ ग्रामस्थांचा महावितरण अधिकाऱ्यांना जाब, पाच दिवसांत सुधारण्याचे आश्वासन
वेरुळ येथील महावितरणच्या स्थानिक कार्यालयात वारंवार खंडित होणाऱ्या वीजपुरवठ्याबाबत ग्रामस्थ, हॉटेल व्यवसायिक, रेस्टॉरंट चालक, दुकानदार, लॉजिंग धारक आणि शेतकऱ्यांनी अधिकाऱ्यांना जाब विचारला.पर्यटकांच्या सोयीसाठी आणि स्थानिक व्यावसायिकांच्या अडचणी लक्षात घेऊन अधिकाऱ्यांशी सविस्तर चर्चा करण्यात आली.अधिकाऱ्यांनी पुढील पाच दिवसांत वीजपुरवठा सुरळीत करण्याचे आश्वासन दिले.यापुढे शुक्रवारी नियमित मेंटेनन्सऐवजी मंगळवारी मेंटेनन्स करण्यात येईल असे सांगण्यात आले.