मेहकर: कोराडी प्रकल्पाच्या १८ कोटींच्या कालवा दुरुस्ती कामाचा केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव व मा.आ.रायमुलकर यांनी घेतला आढावा
केंद्रीय मंत्री नामदार मा.श्री.प्रतापरावजी जाधव साहेब आणि मा.आ.संजयजी रायमुलकर साहेब यांच्या प्रदीर्घ प्रयत्नानंतर कोराडी सिंचन प्रकल्पाच्या कालवा दुरुस्तीसाठी तत्कालीन मुख्यमंत्री मा.ना.श्री.एकनाथजी शिंदे साहेब यांनी २५ कोटी रुपये उपलब्ध करून दिले होते. आज कालवा दुरुस्तीच्या १८ कोटींच्या कामाचा शुभारंभ प्रतापराव जाधव आणि संजय रायमुलकर यांच्या हस्ते करण्यात आला.