हवेली: पिंपरी चिंचवड येथील मासुळकर कॉलनी येथे मनपाची मुख्य पाणीपुरवठा पाईपलाईन फुटली; हजारो लिटर पाणी वाया
Haveli, Pune | Dec 1, 2025 पिंपरी चिंचवड शहरातील मासुळकर कॉलनी परिसरात महापालिकेची मुख्य पाणीपुरवठा पाईपलाईन फुटली आहे. खंडणीविरोधी पथकाच्या कार्यालयासमोरील रस्त्यावर ही पाईपलाईन तुटल्याने हजारो लिटर पिण्याचे पाणी तासांपासून वाया गेली आहे. स्थानिक नागरिकांनी पिंपरी चिंचवड महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाने तातडीने दुरुस्ती करून पाण्याची नासाडी थांबवावी, अशी मागणी केली आहे.