दारव्हा: दारव्हा नगर परिषदेवर शिवसेनेचा झेंडा, शिवसेना 12, काँग्रेस ७, भाजप २ तर स. पा. ला १ जागा
दारव्हा नगर परिषदेच्या च्या सार्वत्रिक निवडणुकीत शिवसेनेने १२ तर काँग्रेसने ७ जागा मिळवीत वर्चस्व सिद्ध केले आहे. एकूण ११ प्रभागांतील अ आणि ब अशा २२ जागांसाठी झालेल्या निवडणुकीत ७ ठिकाणी काँग्रेस व १२ जागेवर शिवसेनेने विजय मिळवला, तर भाजपाला २ जागा व समाजवादी पार्टीचा एका ठिकाणी विजय झाला आहे.