शिरपूर: शिरपूर वरवाडे नगरपरिषद निवडणूकीत मतदान केंद्रनिहाय मतदान अधिकारी व कर्मचारी मतदान केंद्रावर मतदान साहित्यासह रवाना
Shirpur, Dhule | Dec 1, 2025 शिरपूर वरवाडे नगरपरिषद निवडणूकीसाठी मंगळवार 2 डिसेंबर रोजी होत असलेल्या मतदान प्रक्रियेसाठी नियुक्त 375 मतदान अधिकारी व कर्मचाऱ्यांना शहरातील मुकेशभाई पटेल टाऊन हॉलमध्ये मतदान यंत्रांसह साहित्याचे वितरण करण्यात आले असून त्यानंतर अधिकारी व कर्मचारी पोलीस बंदोबस्तासह शहरातील मतदान केंद्रावर रवाना झाले.मतदानासाठी शहरातील एकूण 65 हजार 789 हजार मतदार 16 मतदान केंद्राववरील 75 बूथद्वारे मतदान करून मतदानात भाग घेणार आहेत.