शहरातील मुख्य बसस्थानकासमोरून जाणाऱ्या प्रमुख मार्गावर सध्या प्रशासनाच्या आशीर्वादाने खड्ड्यांचा 'रंगोत्सव' पाहायला मिळत असून, या मार्गाची अक्षरशः चाळणी झाली आहे. दररोज शेकडो एसटी बसेस, खासगी वाहने आणि पादचाऱ्यांची वर्दळ असलेल्या या मुख्य रस्त्यावर पडलेल्या मोठमोठ्या खड्ड्यांमुळे वाहनधारकांना मरणयातना सोसाव्या लागत आहेत. रस्त्याची अवस्था इतकी दयनीय झाली आहे की, येथे रस्ता शोधण्यासाठी आता भिंगाची गरज भासत असून, खड्डे चुकवण्याच्या नादात दुचाकीस्वारांचे कंबरडे मोडले जात आहे.