दहशत निर्माण करण्यासाठी लोखंडी तलवार घेऊन फिरणाऱ्या तरुणांना ताब्यात घेतल्याची घटना उघडकीस आली.ही कारवाई स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने केली.जांब रोडवरील चिंतामणी नगरच्या खुल्या जागेवर एक जण तलवार घेऊन फिरत असल्याची माहिती मिळाली असता स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने घटनास्थळी धाव घेऊन यश नामक आरोपीला ताब्यात घेतले.