वैजापूर: धनादेश अनादरण प्रकरणी सुंदर गणपती गल्ली येथील आरोपीस १ महीना कारावास व एक लाख वीस हजार रुपये दंडाची शिक्षा
व्यवसायासाठी रकमेची गरज असल्याचे सांगून आरोपीने हात उसने म्हणून घेतलेल्या ७० हजार रुपयांच्या परतफेडीसाठी दिलेला धनादेश अनादरीत झाल्याप्रकरणी आरोपीस १ महीना कारावास, एक लाख वीस हजार रुपये दंड व सदरिल दंडाची रक्कम फिर्यादिस देण्याचे तसेच यात कसूर केल्यास अतिरिक्त करावासाची शिक्षा प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी श्रीमती एम. ए. बेंद्रे यांनी सुनावली.