खोपोली नगरपरिषदेच्या आगामी सार्वत्रिक निवडणूक २०२५ च्या पार्श्वभूमीवर शिवसेना, भाजप व आर.पी.आय. महायुतीच्या प्रचारार्थ आयोजित जाहीर सभेत महायुतीचे प्रमुख नेते एकत्र येत दमदार शक्ति प्रदर्शन झाले. शनिवार दि. २२ नोव्हेंबर २०२५ रोजी दुपारी ४.०० वा. महाराजा मंगल कार्यालय, खोपोली येथे ही सभा उत्साहात पार पडली. या सभेला उद्योगमंत्री उदय सामंत, मावळ लोकसभा मतदारसंघाचे खासदार आप्पा बारणे, कर्जत-खालापूर मतदारसंघाचे कार्यसम्राट आमदार माननीय महेंद्र थोरवे व भाजप रायगड जिल्हाध्यक्ष अविनाश कोळी यांची प्रमुख उपस्थिती लाभली.