आर्णी: दूध घ्या असे म्हटल्याच्या कारणावरून वाद करून केली मारहाण; जवळा येथील घटना
Arni, Yavatmal | Nov 7, 2025 आर्णी तालुक्यातील जवळा येथे माजी दूध आधी घ्या असे म्हटल्याच्या कारणावरून वाद करून मारहाण केल्याची घटना दिनांक ६ नोव्हेंबरला घडली आहे सदर घटनेची तक्रार अर्ज प्रमोद भाऊराव भुरे वय वर्ष 37 राहणार जवळा यांनी दिली आहे तक्रारीनुसार आरोपी देविदास कावडे हर्षल देविदास कावडे दोन्ही राहणार जवळा व तक्रारदार हे दुध डेअरीवर दूध देण्यासाठी गेले असता माझे दूध घ्या असे तक्रारदारांनी म्हटल्याच्या कारणावरून वाद करून थापड बुक्क्यांनी मारहाण केली