सिंधुदुर्ग जलतरण संघटने द्वारे मालवण येथे आयोजित दोन दिवसीय पंधराव्या राज्यस्तरीय सागरी जलतरण स्पर्धेत रामटेकच्या सृष्टी सौंदर्य ग्रुपच्या पाच जलतरणपटूंनी आपल्या उत्तम कामगिरीचा परिचय दिला. 14 डिसेंबरला या स्पर्धेत भाग घेत रामटेकचा जलतरणपटू भार्गव मोकदम ने वय 11 व 12 वर्षे या वयोगटातील 10 किलोमीटर स्पर्धा 2 तास 23 मिनिटात पूर्ण केली. तर दुसऱ्या दिवशी 15 डिसेंबरला 2 किमी स्पर्धेत याच वयोगटात 125 जलपटूंनी भाग घेतला. यात त्याने सातव्या स्थानाचे मानांकन प्राप्त झाले.