कुही: गंगादेवी देवस्थान गंगानगर वेलतुर येथे नवरात्री निमित्ताने घटस्थापना
Kuhi, Nagpur | Sep 22, 2025 ग्रामीण भागात असलेल्या गंगादेवी देवस्थान गंगानगर वेलतुर येथे 22 सप्टेंबर सोमवारला सकाळी 11 वाजताच्या सुमारास घटस्थापना करण्यात आली. याबाबत चे वृत्त असे की दरवर्षी प्रमाणे यावर्षी सुद्धा गंगादेवी देवस्थानच्या वतीने नवरात्री निमित्ताने ह.भ.प.ईश्वर महाराज मंदीरकर यांच्या हस्ते पूजा अर्चना करून घटस्थापना करण्यात आली. याप्रसंगी 52 ज्योती पेटवून घटस्थापना करण्यात आली. यावेळी गंगादेवी देवस्थान चे पदाधिकारी व गावातील नागरिक व भावीक आदी उपस्थित होते.