नागपूर ग्रामीण: वाळूच्या गैरव्यवहार आढळल्यास संबंधिताविरुद्ध कठोर कार्यवाही ; महसूल मंत्री बावनकुळे यांचा इशारा
आज नियोजन भवन येथे महसूल विभागाच्या विभागीय आढावा बैठकीचे आयोजन करत होते या बैठकीला महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे उपस्थित होते.सर्वसामान्यांना घरासाठी सहज व सुलभ पद्धतीने वाळू उपलब्ध व्हावी यासाठी आपण नवे वाळू धोरण जाहीर केले. यात विविध घाटांच्या लिलावात पारदर्शकता आणली आहे. जे वाळू घाट निश्चित करण्यात आले आहेत त्या वाळूघाटाच्या एकूण उपलब्ध वाळूच्या दहा टक्के वाळू ही घरकुलासाठी राखीव ठेवण्यात आली.