एरंडोल: निपाणे येथील भिलाटी जवळील विहिरीतून पाणी काढताना पाय घसरून कोसळून तरुण ठार, कासोदा पोलिसात अकस्मात मूर्तीची नोंद
एरंडोल तालुक्यात निपाणे हे गाव आहे. या गावातील भिलाटी जवळ अमृत मधुकर सोनवणे वय ३३ राहणार जवखेडे सिम ता. एरंडोल हा तरुण विहिरीतून पाणी काढत होता. त्याचा पाय घसरला आणि तो विहिरीत कोसळला तातडीने त्याला तेथून काढून ग्रामीण रुग्णालय येथे नेण्यात आले तेथे डॉक्टरांनी तपासणी करून त्याला मयत घोषित केले. तेव्हा या प्रकरणी कासोदा पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.