रामटेक: कडबिखेडा येथे रानडुकराच्या हल्ल्यात 65 वर्षीय शेतकरी जखमी
Ramtek, Nagpur | Sep 17, 2025 रामटेक तालुक्यातील पवनी एक संघ नियंत्रण कक्ष वनपरिक्षेत्रांतर्गत असलेल्या कडबिखेडा येथील शेतकरी हरिराम केशव तुमडाम वय 65 वर्षे यांचेवर बुधवार दिनांक 17 सप्टेंबरला सकाळी 8:00 वाजता च्या दरम्यान एका रानडुकराने हल्ला चढवीत त्यांना जखमी केले. यावेळी शेतकरी हरिराम हे शेतात बैल बांधत होते.