कारंजा: जिवंत विद्युत तारेचा स्पर्श झाल्याने महिलेचा जागीच मृत्यू ..चंदेवाणी शिवारातील घटना....
Karanja, Wardha | Sep 15, 2025 शेतात तुटून पडलेल्या जिवंत विद्युत तारेचा स्पर्श झाल्याने महिलेचा मृत्यू झाल्याची घटना रविवारी दुपारी अडीच ते तीन च्या दरम्यान कारंजा तालुक्यातील चंदेवाणी शिवारात घडली शालू लक्ष्मण भुयार वय 63 असे मृत महिलेचे नाव आहे दुपारी दोन ते अडीचच्या सुमारास जोरदार पाऊस झाला या पावसामुळे शेतातून गेलेल्या वीज खांबावरील तारा तुटून पडल्या.या तुटलेल्या तारा बद्दल कोणतीच माहिती नसल्याने आणि पाऊस येत असल्याने आश्रय साठी जात असताना या विद्युत तारेला स्पर्श होऊन त्यांचा मृत्यू झाला ..