चिखली: धोत्रा फाट्याजवळ दुचाकीला रोही धडकला ; १ ठार, १ गंभीर
मोटार सायकलवर घराकडे जात असतांना अचानक रोड ओलांडणाऱ्या रोहीची मोटार सायकलला जोरदार धडक बसली. यामध्ये एकाचा जागीच मृत्यू झाला तर एक जण गंभीर जखमी झाल्याची घटना १७ऑक्टोबर रोजी दुपारी धोत्रा फाट्या जवळ घडली.अंढेरा पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या चिखली ते दे राजा या नॅशनल हायवे रोडचे चौपदरी सिमेंट रस्त्याचे काम गेल्या आठ ते दहा वर्षापूर्वी पूर्ण झाले. या रस्त्यावरून लहान मोठी वाहने भरधाव वेगाने धावतात. या जंगलात रोही जनावरांचे मोठ्या प्रमाणात वास्तव्य अस