धुळे जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या जिल्हा वार्षिक योजनेच्या आढावा बैठकीत कृषी प्रधान सचिव व पालक सचिव विकासचंद्र रस्तोगी यांनी निधी नियोजनाबाबत कठोर निर्देश दिले. मंजूर कामांचा निधी वेळेत खर्च होणे आवश्यक असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. पायाभूत सुविधा मजबूत करणे आणि पेसा क्षेत्रातील निधीतून उत्पन्नवाढीची कामे प्राधान्याने करावीत, असे त्यांनी सांगितले. २०२४-२५ मध्ये १०० टक्के निधी विनियोग केल्याबद्दल त्यांनी जिल्हाधिकारी भाग्यश्री विसपुते यांचे कौतुक केले.