इथेनॉल टँकरची वेल्डिंग करताना भीषण स्फोट, एक ठार दोन जखमी
Chhatrapati Sambhajinagar, Chhatrapati Sambhajinagar | Sep 15, 2025
छत्रपती संभाजीनगर: टँकर चालकाने इथेनॉल टँकरला वेल्डिंग करण्याचे सांगितलं.वेल्डर इथेनॉल टँकरची वेल्डिंग करण्यासाठी टँकरमध्ये गेला. यावेळी अचानक भीषण स्फोट झाला. या स्फोटात एक कामगार ठार झाला तर दोन जण जखमी झाले आहेत. हा भीषण अपघात शेंद्रा एमआयडीसी येथे घडला. या प्रकरणी करमाड पुलस्थानात नोंद करण्यात आली आहे.