सातारा: सोमवार एक डिसेंबरच्या रात्री दहा नंतर प्रचारास बंदी
Satara, Satara | Nov 29, 2025 कराड, महाबळेश्वर, म्हसवड, पाचगणी, फलटण, रहिमतपूर, सातारा, वाई, मलकारपूर व मेढा या स्थानिक स्वराज्य संस्थेसाठी मतदान मंगळवार दि. 2 डिसेंबर 2025 रोजी होणार असून या अनुषंगाने दि. 1 डिसेंबर 2025 रोजीच्या रात्री 10 वाजता प्रचार बंद होईल, असा सुधारित आदेश राज्य निवडणूक आयोग यांच्यातर्फे देण्यात आला आहे. 1 डिसेंबर 2025 रोजीच्या रात्री 10 नंतर सभा, मोर्चे, ध्वनिक्षेपकाचा वापर करता येणार नाही. तसेच निवडणूक प्रचाराशी संबंधित जाहिरात प्रसिद्ध/प्रसारण देखील बंद होईल.