भाजप प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांच्या विधानावर बोलताना राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनिल तटकरे यांनी राष्ट्रवादी भाजप सोबत राहिल असे जाहिर केले होते. तर शिवसेनेच्या फुटीचे वेळी शिंदे समर्थक गुहाटीला गेले होते या मुद्द्यावर तटकरे यांनी टिका केली होती. या वर बोलताना मंत्री भरत गोगावले यांनी राष्ट्रवादी सत्ते शिवाय राहू शकत नसल्याचा टोला हाणला. तर आम्ही गुहाटीला गेलो म्हणून तुम्ही हे चांगले दिवस पाहता अस गोगावले म्हणाले.