देवरी: नागरिकांनीच लोकवर्गणीतून बुजविले खड्डे शिवनी ग्रामस्थांचा पुढाकार
Deori, Gondia | Sep 16, 2025 देवरी पंचायत समिती अंतर्गत शिवनी गावातील मुख्य रस्ता गेले अनेक दिवसांपासून खड्डेमय झाल्याने नागरिक वाहन चालक व पादचारी यांना रहदारी करताना प्रचंड त्रास सहन करावा लागत होता ग्रामस्थांनी वारंवार संबंधित विभागाला पत्रव्यवहार करूनही रस्ता दुरुस्तीकडे दुर्लक्ष केले अखेर ग्रामस्थांनीच पुढाकार घेत लोकवर्गणी करून स्वतः श्रमदानाने खड्डे बुजवून रस्ता सुरक्षित केला रस्ते विकासाचे द्योतक मानले जातात शासनाचा उद्देशही प्रत्येक रस्ता मुख्यमार्गाला जोडणे आहे देशात सर्वत्र रस्त्यांचे जाळे विणले जात आहे