भंडारा शहरातील खात रोड, रजनी नगर येथील रहिवासी रामराज शालीकराम सार्वे यांच्या बेला येथील 'राज बीअर शॉपी'मध्ये अज्ञात चोरट्यांनी धाडसी चोरी केल्याची घटना समोर आली आहे. दि. २७ डिसेंबरच्या रात्री १० ते २८ डिसेंबरच्या पहाटे ४:३० वाजेदरम्यान चोरट्यांनी दुकानाचे शटर वाकवून आत प्रवेश केला आणि काउंटरमधील रोख २,५०० रुपयांसह ४,८०० रुपये किमतीचे मॅग्नम बीअरचे २४ कॅन व १,२०० रुपये किमतीचे दुबर्क बीअरचे ८ कॅन, असा एकूण ८,५०० रुपयांचा माल चोरून नेला. या प्रकरणी फिर्यादीच्या तक्रारीवरून भंडारा पोलीस.