बुलढाणा शहरातील बसस्थानकाजवळ २४ नोव्हेंबर रोजी पोलिसांनी केलेल्या कारवाईत १३ लिटर हातभट्टीची दारू सह १ हजार ४०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.याप्रकरणी पोलिस कॉन्स्टेबल विनोद केशवराव बोरे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून नितीन विजय शेळके विरुद्ध बुलढाणा शहर पोलिस स्टेशनला गुन्हा दाखल केल्याची माहिती २६ नोव्हेंबर रोजी सकाळी ९ वाजता पोलिस सुत्रांकडून प्राप्त झाली आहे.