राधानगरी: राधानगरी धरणातून अडीच हजार क्यूसेक पाण्याचा विसर्ग. भोगावती पंचगंगा नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा
राधानगरी धरणातून आज रविवार 15 जून सायंकाळी साडेपाच वाजता मोठ्या प्रमाणावर पाण्याचा विसर्ग करण्यात आला आहे. हा विसर्ग टप्प्याटप्प्याने वाढवण्यात येणार आहे.धरणाचा विसर्ग 1000 cusecs ने वाढवून 2500 cusec करण्यात आला आहे. तरी भोगावती व पंचगंगा नदीकाठच्या नागरिकांनी सतर्क राहावे असे आवाहन पाटबंधारे विभागाने केले आहे m