गोंदिया: बोरगाव मार्गावर मोटरसायकलच्या धडकेत युवक ठार, मागे बसलेला तरुण जखमी
Gondiya, Gondia | Sep 22, 2025 उदयटोली - बोरगाव मार्गावर झालेल्या अपघातात एक तरुण ठार तर दुसरा गंभीर जखमी झाला. सदर घटना 27 ऑगस्ट रोजी सायंकाळी सहा वाजता घडली. या प्रकरणी गोरेगाव पोलीस ठाण्यात 20 सप्टेंबर रोजी मोटरसायकल चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. लक्की मेश्राम वय 18 वर्षे असे मृतकाचे नाव आहे.