राहाता: १७०० कोटींचा खर्च. तरीही नगर मनमाड हायवे बनतोय मृत्यूचा सापळा. मा.खासदारांची SIT चौकशीची मागणी.
नगर-मनमाड महामार्गावरील मृत्यंचा थरकाप उडवणार आकडा समोर आलाय. गेल्या तीन वर्षात चारशे अपघात झाले असून जवळपास तीनशे जणांचा मृत्यु झाला आहे. गेल्या पाच दशकांपासून महामार्ग सुस्थितीत करण्याचं फक्त आश्वासन दिले जातं मात्र प्रत्यक्षात रस्ता आजही खड्डेमय व जीवघेणा ठरतोय. या महामार्गासाठी आतापर्यंत तब्बल १७०० कोटी खर्च झाल्याचं समजतंय. कोट्यावधींच्या निधीचा चुराडा होऊन आजही हा रस्ता मृत्युचा सापळा ठरतोय. त्यामुळे जनतेतून संतापाची लाट उसळली आहे.