भडगाव: वाक येथे दत्तप्रभुंच्या यात्रोत्सवासह लोकनाटयांचीही जत्रा, भक्तांनी लाभ घ्यावा आयोजकांचे आवाहन,
दरवर्षाप्रमाणे यंदाही १३ डिसेंबर रोजी मोठ्या उत्साहात भडगाव तालूक्यातील वाक येथे येथे योत्रोत्सवाला प्रारंभ होत आहे. या यात्रोत्सवानिमित्त वाक गावांत विविध धार्मिक व मनोरंजनाच्या कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असून, यामुळे परिसरातील भाविकांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. यात्रोत्सवाची सुरुवात सकाळी मंगल स्नान आणि सायंकाळी ५ वाजता आरतीने होणार आहे. धार्मिक कार्यक्रमांमध्ये सायंकाळी पालखीचे नियोजन करण्यात आले आहे.