मकर संक्रांतीचा सण जवळ येत असतानाच, पतंगबाजीसाठी वापरल्या जाणाऱ्या जीवघेण्या नायलॉन मांजाविरुद्ध जळगाव जिल्हा पोलीस दलाने आक्रमक पाऊल उचलले आहे. शहरासह ग्रामीण भागातील मोकळ्या मैदानांवर नायलॉन मांजाचा वापर करून पतंगबाजी करणाऱ्यांवर आता ड्रोन कॅमेऱ्यांद्वारे करडी नजर ठेवली जाणार आहे. अशी माहिती पोलीस अधीक्षक महेश्वर रेड्डी यांनी गुरुवारी 1 जानेवारी रोजी सायंकाळी सहा वाजता दिली आहे.