औंढा नागनाथ: अवैध वाळूची वाहतूक महसूल पथकाने असोंदा शिवारात वाहन पकडले;4 लाख 53 हजाराचा मुद्देमाल जप्त तिघांवर गुन्हा दाखल
औंढा नागनाथ तालुक्यातील मेथा ते असोंदा मार्गावर असोंदा शिवारात मधुमती नदीपात्रातून अवैध वाळू उपसा करून ट्रॅक्टरने वाहतूक करणाऱ्या एका वाहनावर औंढा नागनाथ तहसील कार्यालयाच्या महसूल पथकाने दिनांक 26 नोव्हेंबर बुधवार रोजी दुपारी दोन वाजे दरम्यान कारवाई करून ट्रॅक्टर वाहन व वाळूसह 4 लाख 53 हजाराचा मुद्देमाल जप्त करत वाहन पोलीस ठाणे आवारात आणून लावण्यात आले आहे. याप्रकरणी मंडळ अधिकारी अशा गीते यांच्या फिर्यादीवरून चालक,हेड मालक ट्रॉलीमालक अशा तिघांवर औंढा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला