रावेर: कुसुंबा खुर्द येथे बापाने केली मुलाची हत्या, मृतदेहाजवळ रात्रभर होता बसून,रावेर पोलीसात गुन्हा दाखल
Raver, Jalgaon | Nov 19, 2025 रावेर तालुक्यात कुसुंबा खुर्द हे गाव आहे या गावातील रहिवाशी रवींद्र भगवान पाटील यांनी शेती व प्रॉपर्टीच्या हिस्स्याच्या वादातून त्यांचा मुलगा सचिन रवींद्र पाटील वय ३२ याला मारहाण केली त्याचे दोरीने हातपाय बांधून लाकडी मोगरीच्या डोक्यात मारून त्याला ठार मारून टाकले. मुलाची हत्या केल्यानंतर ते त्याच्या मृतदेहाजवळ रात्रभर बसून होते. तेव्हा याप्रकरणी रावेर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे