आरमोरी: विहीरगांव बिटात वन जमिनीवर अतिक्रमणाचा डाव वन विभागाने हाणून पाडला, साहित्य जप्त
वनपरिक्षेत्र आरमोरी अंतर्गत येणाऱ्या विहिरगाव बीट सर्वे क्र. 41 मधील जास्त घनतेच्या जंगलात होणारा अतिक्रमण वन विभागाच्या सतर्कतेमुळे हाणून पाडण्यात आला व वन जमिनीवर अतिक्रमण करण्याकरीता लावण्यात आलेली काटेरी तार व अन्य साहित्य जप्त करीत कारवाईचा पंचनामा करण्यात आला अशी माहिती आज दि.१४ सप्टेबंर रविवार रोजी दूपारी १२ वाजता आरमोरी वनपरिक्षेत्र कार्यालयाकडून देण्यात आली.