देवळाली नगरपालिकेमध्ये आम्ही जरी अल्पमतात असलो तरी भाजपाच्या नगरसेवकांना आम्ही सुरूंग लावू उपनगराध्यक्ष पदासाठी सर्वानुमते संतोष चोळके यांचा अर्ज भरू व तेच उपनगराध्यक्ष होतील असा दावा काँग्रेसचे नेते दत्तात्रय कडू यांनी केला आहे. आज गुरुवारी दुपारी माध्यमांशी संवाद साधताना त्यांनी हा दावा केल्यानंतर देवळालीचा राजकारणात चांगलीच खळबळ उडाली आहे.