सार्वजनिक आरोग्य विभाग, महाराष्ट्र शासन यांच्या वतीने HPV लसीकरण मोहीम सुरू करण्यात आली आहे. ही मोहीम ९० दिवस (३ महिने) चालणार असून पात्र मुलींना ही लस दिली जाणार आहे. 💉 HPV लसीकरणामुळे भविष्यात होणाऱ्या गर्भाशय मुखाच्या कर्करोगापासून संरक्षण मिळते. 👉 सर्व पालकांनी व नागरिकांनी आपल्या परिसरातील आरोग्य केंद्रात संपर्क साधून पात्र मुलींना HPV लस घेण्यासाठी प्रोत्साहन द्यावे. आपले सहकार्य – मुलींचे सुरक्षित भविष्य 🙏