कोपरगाव: काळा कारभार उत्तर स्पर्धा" पत्रकांमुळे कोपरगावात खळबळ; राष्ट्रवादी (अजित पवार गट) कडून पोलिसांकडे तक्रार
गेल्या दोन दिवसांपासून शहरात जागरूक कोपरगावकर विचारमंच आयोजित , काळा कारभार उत्तर स्पर्धा या नावाने निनामी पत्रके वाटण्यात येत असून, त्यामध्ये आमदार आशुतोष काळे यांच्यावर आक्षेपार्ह प्रश्न विचारत स्पर्धा घेण्यात येणार असल्याचे नमूद करण्यात आले आहे. या निनामी पत्रकामुळे राजकीय वर्तुळात चांगलीच खळबळ उडाली आहे.या पार्श्वभूमीवर कोपरगाव राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित पवार गट तर्फे आज 5 नोव्हेंबर रोजी सकाळी 10 बाईट शहर पोलिस ठाण्यात निवेदन देण्यात आले आहे.