अमळनेर तालुक्यातील लोण खुर्द येथे माणुसकीला काळीमा फासणारी अत्यंत हृदयद्रावक घटना गुरूवारी ११ डिसेंबर रोजी दुपारी ३ वाजता उघडकीस आली आहे. लोण खुर्द -मुडी रस्त्यावरील एका बंद घराजवळ कोणीतरी अज्ञात व्यक्तीने एका नवजात मानवी अर्भकाला निर्दयपणे उघड्यावर फेकून दिल्याचे समोर आले आहे. या कृत्यामुळे गंभीर जखमी झालेल्या अर्भकाचा उपचारापूर्वीच मृत्यू झाला.