उदगीर: नागरिकांचे प्रलंबित प्रश्न सोडविण्यासाठी सेवा पंधरवाडा कार्यक्रम,तहसीलदार राम बोरगांवकर
Udgir, Latur | Sep 16, 2025 राज्य सरकारच्या सूचनेनुसार १७ सप्टेंबर ते २ ऑक्टोबर दरम्यान उदगीर तालुक्यात सेवा पंधरवाडा कार्यक्रम राबविण्यात येणार असून या कार्यक्रमात शेतकऱ्याचे प्रलंबित प्रश्न, नागरिकांचे प्रलंबित प्रश्न सोडविण्यात येणार आहेत, तसेच शासकीय जमिनीवर अतिक्रमण करून बसलेल्या पात्र नागरिकांना कबाले वाटप करण्यात येणार आहे,या कार्यक्रमात उदगीर तालुक्यातील नागरिकांनी सहभाग नोंदवून आपले प्रलंबित प्रश्न सोडवून घ्यावे असे आवाहन उदगीरचे तहसीलदार यांनी माध्यमासमोर बोलताना केले आहे