शालेय शिक्षणासोबतच विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी विविध उपक्रम राबविण्यात येतात. सहली, पर्यटन व धार्मिक स्थळांच्या भेटींसोबतच सामाजिक जाणिव निर्माण व्हावी, या उद्देशाने दारव्हा येथील नगर परिषद शाळा क्र. ३ ने एक अभिनव उपक्रम राबविला. शाळेच्या चिमुकल्या विद्यार्थ्यांनी दारव्हा तालुक्यातील साधुबुवा वृद्धाश्रमाला भेट देत एक दिवस वृद्धांसोबत घालवला व त्यांना भावनिक आधार दिला.