साडेतीन शक्तीपीठांपैकी एक महत्त्वाचे पीठ असणाऱ्या करवीर निवासीनी अंबाबाई देवीच्या शारदीय नवरात्र उत्सवाला सुरुवात झाली आहे. पहिल्याच दिवशी पहाटेपासून भाविकांनी रांगा लावून अंबाबाई चरणी लीन होऊन दर्शन घेतला आहे.दरम्यान संपूर्ण मंदिर परिसर हा रंगीबेरंगी फुलांनी सजवण्यात आला असून मंत्रोच्चार करत धार्मिक विधी देखील मंदिरात पार पडलेत. पोलिसांनी मंदिर परिसरात कडेकोट बंदोबस्त ही ठेवला आहे.