आ. भावनाताई गवळी यांच्या उपस्थितीत केनवड येथे दिनांक 19 ऑक्टोबर रोजी अनेकांनी शिवसेनेत प्रवेश घेतला. यावेळी आ. भावनाताई गवळी यांनी येणाऱ्या जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकीसाठी सर्वांना कामाला लागण्याचे सांगून जिल्हा परिषदेवर शिवसेनेचा भगवा फडकविण्याचे आवाहन केले. सदर कार्यक्रमाला पदाधिकारी, कार्यकर्ते, शिवसैनिक व गावातील महिला, पुरुष मोठ्या संख्येने उपस्थित होते.