सेनगाव: केलसुला येथील अनेक कार्यकर्त्यांचा शिवसेना ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख संदेश देशमुख यांच्या नेतृत्वात पक्षप्रवेश
सेनगाव तालुक्यातील आज शिवसेना ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख संदेश देशमुख यांच्या नेतृत्वाखाली भव्य पक्षप्रवेश सोहळा संपन्न झाला.यावेळी शिवसेनेचे पदाधिकारी़, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी जिल्हाप्रमुख संदेश देशमुख यांनी सर्व कार्यकर्त्यांना पक्षांमध्ये प्रवेश देऊन पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.यावेळी शिवसेना ठाकरे गटाचे तालुकाप्रमुख संतोष देवकर हत्ता सर्कल प्रमुख हरिभाऊ काळे,साखरा सर्कल प्रमुख संजय चिलगर यांच्यासह पदाधिकारी,कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.