अर्जुनी मोरगाव विधानसभा क्षेत्रात माजी मंत्री तथा आमदार राजकुमार बडोले यांच्या संकल्पनेने तथा आमदार सांस्कृतिक महोत्सव समितीच्या माध्यमातून भव्य पाच दिवसीय सांस्कृतिक महोत्सव आयोजित करण्यात येणार असून हा महोत्सव भारतीय लोकसंस्कृतीचा वारसा जपण्यासाठी सडक अर्जुनी आणि अर्जुनी मोरगाव येथे होणार आहे.महोत्सवाची सुरुवात १९ डिसेंबर रोजी आशीर्वाद लॉन, सडक अर्जुनी येथे पावा यांच्या लाइव्ह म्यूजिक आणि मेडिटेशन कार्यक्रमाने होईल. २० डिसेंबरला दांडिया स्पर्धा, २१ डिसेंबरला पारंपारिक नृत्य स्पर्धा,